Sunday, 23 November 2025

महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहनhttps://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName

 महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी 27 नोव्हेंबरपर्यंत

हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 22 : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्त स्तरावर केले आहे. या बाबत काही हरकती व सूचना किंवा तक्रारी असल्यास दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यातअसे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असूनत्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील मतदारांचे नाव https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर पाहता येईल. त्यावर 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणेनावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इ. स्वरूपाची कार्यवाही केली जात नाही. मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकांसंदर्भात, तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतीलअसेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi