Saturday, 29 November 2025

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी

1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

 

मुंबईदि. 28 : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असूनत्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगरपरिषदनगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभामोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi