Friday, 10 October 2025

आदिवासी समाजाच्या संशोधनावर 'टीआरटीआय'ने भर द्यावा

 आदिवासी समाजाच्या संशोधनावर 'टीआरटीआय'ने भर द्यावा

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांचे निर्देश

 

मुंबई, दि. ९ : आदिवासी समाजाच्या चालीरीती, बोलीभाषा, राहणीमान, उत्पन्नाचे स्त्रोत यावर विस्तृत संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधनाच्या आधारे समाजाच्या अंतिम घटकाच्या कल्याणासाठी योजना राबवण्यास मदत होईल. त्यामुळे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (टीआरटीआयची) आदिवासी समाजाच्या संशोधनावर भर द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी दिले.

'टीआरटीआय' च्या सक्षमीकरणासाठी सबंधित संवर्गातील अधिकारी नियुक्त करावे. संशोधन शाखेला बळकट करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ तसेच या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करावी. आदिवासी समाजातील महापुरुषांचा इतिहास शेवटच्या समाजाच्या विद्यार्थ्याला माहिती होण्यासाठी महापुरुषांवर आधारित पुस्तकांची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालयात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत बैठक झाली. बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारे, ‘टीआरटीआय’ च्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव श्री. शेळके, संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, उपसंचालक श्री. फिरके, प्रशासकीय अधिकारी कैलास खेडकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi