Sunday, 21 September 2025

क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी नवीन क्रीडा धोरण तयार करावे

 क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी

नवीन क्रीडा धोरण तयार करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

              मुंबईदि. ११ :- राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी व क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी क्रीडाविषयक विविध बाबींचा सखोल अभ्यास करून नवीन क्रीडा धोरण तयार करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात समिती कक्षात क्रीडा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात  बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कटफळ ता. बारामती येथे प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. अद्ययावत आणि अनुरूप क्रीडा सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक निर्देश दिले.

    राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करावीत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधासाधन-सामग्री उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावेविभागीयजिल्हा आणि तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करावी,असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत वेगवेगळ्या देशांमधील आणि भारतातील विविध राज्यांतील क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेचसार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यांचा क्रीडा क्षेत्रात प्रभावी उपयोग कसा करता येईलयावर चर्चा करण्यात आली.

            बैठकीस क्रीडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटेक्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजेवित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए.,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवारक्रीडा आयुक्त शीतल तेली - उगले,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi