Sunday, 21 September 2025

शासकीय पडिक जमिनीवर बांबू लागवडीचा विचार

 शासकीय पडिक जमिनीवर बांबू लागवडीचा विचार

श्री. फडणवीस म्हणाले की, बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक परिसंस्था (इको सिस्टिम) तयार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर बांबूच्या मागणी व पुरवठा साखळीवरही भर द्यावा लागणार आहे. बांबूचे उत्पन्न मिळण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो, हा कालावधी मोठा आहे, त्यामुळे संशोधकांनी बांबूच्या अशा जाती शोधाव्यात की ज्या दोन वर्षांत उत्पन्न देतील. बांबू बरोबरच नेपिअर गवत एकत्र लावल्यास त्याचा फायदा होईल. बांबू उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या खरेदी धोरणात बांबुच्या वस्तूंचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील ज्या जिल्ह्यात ऊर्जा प्रकल्प आहेत, त्या ठिकाणी बांबू लागवडीवर भर दिला जाईल. राज्यातील शासकीय पडिक जमिनींवर बांबू लागवडीचे मोठे अभियान हाती घेणार आहोत. त्याचबरोबर गडचिरोलीत पाच हजार वृक्ष लागवड केली जाणार असून, तेथील नैसर्गिक अधिवास लक्षात घेऊन बांबूची लागवडही केली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi