Friday, 19 September 2025

कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य

 वृत्त क्र. ३७८८

कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

  • क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन

 

मुंबईदि. १९ : कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. कौशल्य विकास मध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवादसमन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला साकार करूया, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय कौशल्य विकास विभाग व राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे 'क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगल प्रभात लोढा बोलत होते.

यावेळी केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जीराष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) च्या कार्यकारी सदस्य डॉ.विनीता अग्रवाल, संचालक गुंजन चौधरी, महाराष्ट्र राज्याच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्माआयुक्त लहूराज माळीव्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुखरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांसह महाराष्ट्रगुजरातगोवादमण-दीव तसेच दादरा-नगर हवेली येथील कौशल्य विकास विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi