Friday, 29 August 2025

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

 मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी

घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली



 

मुंबई, दि. २९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी गणेशाचे दर्शन घेत मनोभावे आरती केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी सर्व महावाणिज्य दूतांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे ३५ महावाणिज्य दूतांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला.

फ्रान्सचे जीन मारे सेरे चार्लेटब्रिटीश उच्चायुक्तालयाचे राजकीय प्रमुख जॉन निकेलमलेशियाचे अहमद झुवारी युसूफसाउथ कोरियाचे डाँगवान यूब्राझिलचे जाओ दे मेंडोन्का लिमा नेतोबांग्लादेशच्या श्रीमती फरहाना अहमद चौधरीइंडोनेशियाचे इडी वॉरडोयोयूएईचे अब्दुल्ला हुसेन अल्मारझुकीअर्जेंटिनाचे डॅनिअल क्यूर कन्फलोनिरीश्रीलंकेचे प्रियंगा विक्रमसिंघेइजिप्तचे दहिला तवाकोलफिनलंडच्या इवा निल्सनपोलंडचे थोमाझकतारचे अहमद साद अल सुलैतीमॉरिशसचे दुशांत बक्तोवारइसराईलचे कोब्बी शोशनीजपानचे कोजी यागीयुएसएचे मायकेल स्क्रेन्डर टर्कीचे मुस्तफा केमालटीन युगूरपनामाचे रॉर्बटो रॉड्रिग्ज प्रडाइराकचे झुहायर साद अब्बासकुवेतचे शाये अबू शायबाऑस्ट्रेलियाचे पौल मुर्फीआर्यलँडचे टॉम नूनननेदरलँडचे नाबील तौतीबेलारूसचे अलिकसंदर मत्सूकोस्पेनचे जॉर्ज डी लुकास कॅडेनासथायलंडच्या थितीपॉर्न चुचीन्नावटस्वीडनचे उपमहावाणिज्य दूत जोकीम गुन्नारसनस्विर्झलँडचे मॅथिअस कोएग्लसौदी अरेबियाचे सुलेमान ईद अलोतैबीइटलीचे वॉल्टर फेरारामेक्सिकोच्या अड्रिना विल्लानेवाचीनचे क्वीन जीजर्मनीचे क्रिस्टोफ रेंडटॉर्फसिंगापूरचे जेरम वाँगबहरिनचे अली अब्दुल अझीज अल बलुशी यांच्यासह अफगाणिस्तानचे महावाणिज्य दूत यांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला.

गणेश दर्शनआरतीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्रीमती अमृता फडणवीस यांनी सर्वांची वैयक्तिक विचारपूस करीत चर्चा केली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi