Tuesday, 5 August 2025

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील 3,542 रुग्णांना 32 कोटी 32 लाखांची मदत

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून

नाशिक विभागातील 3,542 रुग्णांना 32 कोटी 32 लाखांची मदत

 

        मुंबई, दि. 4 :- राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. नाशिक विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत मागील सात महिन्यांत 3,542 रुग्णांना 32 कोटी 32 लाख 5 हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात पेपरलेस व डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असूनजिल्हा कक्षांची स्थापना केल्यामुळे रुग्णांना मंत्रालयात धाव घेण्याची गरज उरलेली नाही. 20 गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जातेत्यात कॉक्लियर इम्प्लांट (वय 26 वर्षे)हृदययकृतकिडनीफुफ्फुसबोन मॅरो प्रत्यारोपणकर्करोग शस्त्रक्रिया,  अपघातमेंदूचे आजारहृदयरोगबालकांची शस्त्रक्रियानवजात शिशुंचे आजार त्यासोबतच भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त आदी रूग्णांच्या उपचाराकरिता मदत केली जाते.नाशिक विभागातील मदतीचा आढावा (1 जानेवारी ते 31 जुलै 2025)


जिल्हा


रुग्णसंख्या         


मंजूर मदत रक्कम


नाशिक             


1,039                 


10 कोटी 35 लाख 24 हजार


जळगाव


795


6 कोटी 99 लाख 45 हजार


धुळे


95


80 लाख 31 हजार


नंदुरबार


38                    


39 लाख 55 हजार


अहिल्यानगर


1,575                   


13 कोटी 77 लाख 50 हजार


 


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi