Monday, 28 July 2025

वक्फ मंडळाच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करा

 वक्फ मंडळाच्या मालमत्तेवरील

अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करा

- अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. 23 : परभणीसह राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर अतिक्रमण व बेकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

मंत्रालयात आयोजित बैठकीत आशुरखाना नाले हैदर (परभणी), हजरत मोहम्मद हनीफ मस्तान रहेमान सैलानी (वाशिम), पीर साहेब सय्यद रहिमुद्दीन दर्गाह ट्रस्ट (उरण) आणि ईदगाह व्यवस्थापन कमेटी (लातूर) या वक्फ संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सचिव रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सिंह, अवर सचिव मिलिंद शेनॉय, तहसिलदार संदीप राजपुरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, वक्फ मंडळाच्या जागांवर अतिक्रमण आढळल्यास प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर योग्य ती कारवाई करावी. जागेवरील दुकाने अथवा मालमत्तांचे संपुष्टात आलेले भाडेकरार नव्याने करण्यात यावेत. संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना याबाबत सूचना द्याव्यात.

तसेच वक्फ संस्थांमधील गैरव्यवहारांबाबत तक्रारींची चौकशी करून अहवाल पुढील दहा दिवसांत सादर करण्याचेही आदेश श्री. भरणे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi