Thursday, 12 June 2025

पालघर जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्याची तपासणी करून एक महिन्यात अहवाल

 पालघर जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्याची

तपासणी करून एक महिन्यात अहवाल द्या

- वन मंत्री तथा पालघर पालकमंत्री गणेश नाईक

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. ११ : पालघर जिल्ह्यातील टायर पायरोलिसि रिसायकलींग कंपन्यामधील तसेच इतर उद्योगांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्वेक्षण करावे आणि या संबंधीचा अहवाल एक महिन्यात द्यावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील रेड झोन परिसर वाडा तालुक्यातील टायर पायरोलिसिस रिसायकलींग कंपन्यामधील प्रदूषणाबाबत तसेच बोईसर औद्योगिक क्षेत्र व सातपाटी- मुरबे खाडी मधील रासायनिक प्रदूषण बाबत वन मंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी श्री. नाईक बोलत होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, प्रधान वन संरक्षक  नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग, उदय ढगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र प


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi