Wednesday, 18 June 2025

मौजे साखर सुतारवाडीचे दर्जेदार पुनर्वसन करावे

 मौजे साखर सुतारवाडीचे दर्जेदार पुनर्वसन करावे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

 

मुंबईदि. १७ रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर सुतारवाडी गावात २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होवून नुकसान झाले होते. गावाच्या पुनर्वसनासाठी नागरी सुविधांची कामे करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या घरांसाठी वाढीव रक्कम देण्याविषयी प्रस्ताव सादर करावा. मौजे साखर सुतारवाडी गावचे पुनर्वसन दर्जेदार पद्धतीने करण्यात यावेअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले.

            मंत्रालयात साखर सुतारवाडी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरेसहसचिव (मदत) संजय इंगळेअवर सचिव बाळासाहेब हजारे उपस्थित होतेतर दूरदृष्यप्रणालीद्वारे रायगड जिल्हाधिकारी किसन जवळे उपस्थित होते.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणालेपुनर्वसन करताना ४ टक्के निधी हा राज्य व्यवस्थापन कक्षगृहनिर्माण यांना द्यावा लागतो. या निधीबाबत फेरविचार करावा. पुनर्वसन करताना निधी द्यावा लागू नये. टाटा ट्रस्टकोटक बँक यांना पत्र पाठवून घरे बांधण्याची विनंती करण्यात यईल. तसेच इर्शाळवाडीच्या धर्तीवर सुतारवाडीचे पुनर्वसन सिडकोकडून करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र द्यावे. 

जिल्हा प्रशासनाने मौजे साखरवाडी येथे भेट देवून पुनर्वसन तातडीने कसे पूर्ण करता येईलयाबाबत कार्यवाही करावी. जोपर्यंत शासनाकडून ग्रामस्थांची कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था होत नाहीतोपर्यंत शासनाच्यावतीने पुनर्वसन करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असणारे निवारे चांगले असावे. कामाचा दर्जा उत्तम असावा. कुठलीही आपत्ती येण्यापूर्वी प्रशासनाने सजग राहून उपाययोजना कराव्यातअसेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi