Wednesday, 18 June 2025

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्या वार्षिक नियोजन

 टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे

मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबईदि. १७ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय)पुणे यांच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. आदिवासी योजनांचे सुयोग्य नियोजनप्रभावी अंमलबजावणीसाठी ही आराखडा पुस्तिका उपयुक्त ठरणार असल्याचे मत मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी खासदार हेमंत सवराआमदार भीमराव केरामआमदार संजय पुरामआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी उपस्थित होते.

 मंत्री डॉ. वुईके म्हणालेया आराखडा पुस्तिकेत टीआरटीआयच्या आगामी वर्षातील संशोधनप्रशिक्षणमूल्यांकन व धोरणात्मक उपक्रमांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

 विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होण्यासाठी हा आराखडा मार्गदर्शक ठरेल. कामाच्या या आराखड्यामुळे कामास गती येऊन सर्व कामे विहित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi