Wednesday, 11 June 2025

अकोला विकास कामे

 मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे, तसेच पारद येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन व बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडीमहाल येथे ४५ कोटींच्या १० मेगावॅट क्षमतेच्या व रेडवा गाव येथे ९ कोटींच्या २ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. अकोला जिल्ह्यातील अकोला व अकोट या दोन शहरांमध्ये ९ कोटी रू. निधीतून सीसीटिव्ही प्रकल्पाचे लोकार्पणही यावेळी झाले. 

प्रारंभी पालकमंत्री तथा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या अकोला विमानतळ येथे आगमनप्रसंगी पालकमंत्री ॲड. फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींनी स्वागत केले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi