Tuesday, 27 May 2025

स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल

 'स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

एनसीआयला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन

 

नागपूरदि. 26 : कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा  प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईलअसा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

            केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जामठा परिसरातील स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार समीर मेघेसंस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहरउपाध्यक्ष अजय संचेतीमुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकरकोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकरवैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठकपर्नो रिका इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, अनेक संस्थांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम केले आहे. तथापी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ज्या संवेदनशीलतेने कॅन्सर रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर देत उपचार केले जातात ती भावनिक आपुलकी इतरत्र कमी आढळते. येत्या काळात देशातील सर्वात चांगल्या संस्थेमध्ये नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटची गणना होईलअसा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी व्यक्त केला.

ज्या संस्थेमध्ये सेवाभाव असतो तसेच समाजात कुणीही दुःखी राहू नये ही भावना उराशी जपणारे सहकारी असतात त्या संस्था लोकांना अधिक भावतात. लाखो नागरिकांच्या दुःखात सहाय्यभूत होण्याचा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. हा विचार खूप कमी लोकांमध्ये दिसून येतो या शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅन्सर इन्स्टिट्युटचा गौरव केला.

आज ही संस्था अल्पावधीतच वटवृक्ष झाली आहे. स्वस्ती निवासच्या माध्यमातून या इन्स्टिट्युटला पूर्णत्व देण्याचे काम आता होत असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा असल्याचे  गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी काढले.

        मोठ्या प्रमाणावर मुखकर्करोग आपल्या देशात आढळतो. सर्वाइकल कॅन्सर ही आढळतो. काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा दुर्धर आजार समजला जायचा. मात्रआता देशभरात अनेक चांगल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापना झाल्या आहेत. त्यापैकी नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्यप्रदेशतेलंगणाछत्तीसगडमहाराष्ट्र राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. या इन्स्टिट्यूटला केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधा अधिक भक्कम करण्यात येत आहेत. यात नवीन एम्सची निर्मितीएमबीबीएस विद्यार्थी क्षमतेत वाढनवीन रुग्णालयांची निर्मिती व अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi