Tuesday, 27 May 2025

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी

 राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस

प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे

नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी

-----------------

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारीपालिका आयुक्तांना निर्देश

 

मुंबई, दि. 26 : राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठाणेनाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणेमुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या. रत्नागिरीसिंधुदुर्गपालघररायगड जिल्हाधिकारी यांच्याकडूनही परिस्थितीची माहिती घेतली व मदत कार्याबाबत सूचना दिल्या. या सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे 24 तास सुरू राहतील आणि या पक्षातल्या अधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहून काम करावेपावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नयेतसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नयेयासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी.

संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी,तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्तेपुलांची स्थितीविजेच्या तारा यावर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारती संदर्भात देखील काळजी घ्यावीमुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू कशी राहीलकिंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क रहावे, असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले

 हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावेआवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नयेतसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेमात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहेअसे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या मुंबईठाणेरायगडरत्नागिरीसिंधुदुर्गपुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे.

राज्य सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi