Sunday, 27 April 2025

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून 'बेस्ट' व्हावे

 उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून 'बेस्टव्हावे

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

§  बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक

 

मुंबई, दि. २५ मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकरआरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढासांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी,  नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरापरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर श्रीनिवास आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबईतील नागरिकांना प्रवास करताना जास्त ताटकळत थांबावे लागू यासाठी नियोजन करावे. बसच्या संख्या वाढविण्यासोबत बस किती वेळात येणारसध्या कुठे आहेयाची माहिती प्रवाशांना होण्यासाठीच्या यंत्रणेची त्वरित अंमलबजावणी करावी. बांद्रादिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळेरहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मुंबईतील छोटेअरूंद रस्ते पाहता अत्याधुनिक छोट्या बस घ्याव्यात. यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या एन कॅपच्या (नॅशनल क्लिन एअर पॉलिसी) निधीचा वापर करावा.

मुंबईमध्ये लोकल रेल्वेमेट्रोमोनोरेल आणि बससाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रणाली तयार होत आहे. यातून नागरिकांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार असल्याने बेस्टला याचाही फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाच बस डेपोच्या ठिकाणी मराठी सिनेमा थिएटर

बस डेपोंचा पुनर्विकास करताना करमणूक केंद्राचाही विचार करण्याबाबत मंत्री श्री. शेलार यांनी सूचना केल्या. मराठी सिनेमाला उर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी मराठी सिनेमा थिएटरची निर्मिती केल्यास यातूनही उत्पन्न वाढण्यास मदत होईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मनपा’च्या बजेटमध्ये निधीची तरतूद

‘बेस्ट’वरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिका मदत करते. मात्र ‘मनपा’च्या बजेटमध्ये तीन टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद केली तर याचा ‘बेस्ट’ला फायदा होईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बेस्टचे व्यवस्थापक श्री. श्रीनिवास यांनी टोल माफ करावेतकर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीची १६५८ कोटी मिळावेत. सरकारी कर माफ करण्याची मागणी केली. याबाबत प्रस्ताव सादर करावेतशासन याचा सकारात्मक विचार करेलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi