Wednesday, 5 March 2025

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन

 विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन


पुणे, दि. ५ : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.१ येथे आयोजित करण्यात आली असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा महसूल अपर आयुक्त समीक्षा चंद्राकर यांनी कळविले आहे.


प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही श्रीमती चंद्राकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                    000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi