Wednesday, 12 February 2025

विकसित भारत युवा संसद व विकसित भारत राजदूत युवा संपर्क अभियान

 विकसित भारत युवा संसद व विकसित भारत राजदूत युवा संपर्क अभियान

महाराष्ट्रात यशस्वी करणार

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचा निर्धार

 

मुंबई, दि. 11 :- विकसित भारत युवा संसद व विकसित भारत राजदूत युवा संपर्क अभियान महाराष्ट्रात यशस्वी करणार असल्याचा निर्धार क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. अभियानासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला आवश्यक भरीव निधी उपलब्ध करुन द्यावाअशी मागणी क्रीडा मंत्री श्री.भरणे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे यावेळी केली.

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांनी देशातील विविध राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी क्रीडा मंत्री श्री. भरणे बोलत होते.

क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले कीराष्ट्र निर्माणामध्ये युवकांचे योगदान मोठे असते. देशाच्या विकासात युवकांचा मोठा सहभाग आहे. सामाजिक प्रश्नांबाबत युवकांमध्ये जागरूकता असून त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनायुवांच्या अपेक्षा जाणून घेणे महत्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागात युवांच्या सुप्तगुणांना वाव देणेनेतृत्व गुणांचा विकास करणेशासकीय कामांचे स्वरुप समजावणेअशा राज्याच्या प्रगतीसाठीच्या महत्वपूर्ण मुद्यांची ओळख युवा वर्गाला होण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रगत तंत्रज्ञानवैज्ञानिक संकल्पनाशास्त्रोक्त पध्दतीनवीन संशोधनेसमस्यांवर उपाययोजना अशा विविध बाबींमध्ये युवकांशी संवाद साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही श्री.भरणे यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले कीराज्याची भौगोलिक संरचना विचारात घेता युवकांना व्यवसाय-रोजगाराच्या संधीनागरिक व जनसामान्यांकरिता शासकीय योजनांची अंमलबजावणी यासाठी विचार विनिमय आवश्यक आहे. तरुणाईला शासकीय कामकाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणेकार्यक्रम आखणीमध्ये विचारांची दखल घेणेयुवकांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे,  राष्ट्रीय व राज्य विकास प्रक्रियेत युवकांना सामावून घेऊन युवकांचा सर्वांगीण विकास करण्यावर शासन भर देत असल्याचेही क्रीडामंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi