Wednesday, 12 February 2025

पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने, नियोजनबद्ध पूर्ण करावीत

 पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने, नियोजनबद्ध पूर्ण करावीत

- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. ११ : पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजव खंदारेजल जीवन मिशनचे संचालक ई. रवींद्रनबुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा परिषद  मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरातमुख्य अभियंता प्रशांत भांबरेअजय सिंह यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री पाटील म्हणालेपाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायती स्तरावरीलसमस्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर सोडवून योजनांची अंमलबजावणी तातडीने करावी. कार्यक्षम व्यवस्थापनावर भर देत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या सुविधांचा लाभ मिळावायासाठी प्रयत्नशील रहावे.

यावेळी श्री. पाटील यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनाजल जीवन मिशनमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणस्वच्छ भारत अभियान या सर्व विषयाचा सविस्तर आढावा घेतला.

पाणीपुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  ठोस रोडमॅप तयार करणेपाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi