Sunday, 26 January 2025

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

 

महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

 

नवी दिल्लीदि. 25  : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील  शशिकांत रामकृष्ण गजबे  यांना उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर जीवन रक्षा पदक’ पुरस्कार  दादाराव गोविंदराव पवार,  ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर यांना जाहीर करण्यात आले.

            देशातील 49 नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17  नागरिकांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर करण्यात आले. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येतील. देशातील नऊ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण 23 जणांना जाहीर झाले आहेत.

या पुरस्काराचे स्वरूप पदककेंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि  रोख रकम असे आहे. हे पुरस्कार संबंधित राज्य शासनामार्फत नंतर प्रदान करण्यात येतील.  

000

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi