Thursday, 31 October 2024

🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻नरकचतुर्दश *अभ्यंगस्नानाची* संगीत

 ⚜🔆🚩🔆🕉🔆🚩🔆⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                   

                 *नरकचतुर्दशी*

               *अभ्यंगस्नानाची*


        *सैनिकांविषयी कृतज्ञतेची*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *🪔 दीपोत्सव विशेष पर्व  🪔*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🌹🔆🌸🔱🪔🔱🌸🔆🌹


        *गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।*

        *नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं ॥* 


        *आज दीपोत्सवातील तनामनाला अत्यंत सुखावणारा नरकचतुर्दशी.. अभ्यंग स्नानाचा दिवस.*

        *बाहेर धुक्याची चादर पसरलीय. बोचरे वारेही सुरु आहेत. आकाश कंदीलाच्या प्रकाशात अंगणातील शुभदायी रंगीबेरंगी रांगोळी आणखी खुलल्यात. पण थंडीची पर्वा न करता भारवर्षातील लोकांची सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नानाची लगबग सुरु आहे.*

        *बदलत्या ऋतूचा.. थंडीचा सामना करण्यासाठी शरीराला अत्यावश्यक हे स्नान. आज राजालाही हेवा वाटावा असे सुख जनसामान्य आज उपभोगतात. औक्षण करून तीळाचे तेल.. उटणे लावून होणारे हे पवित्र अभ्यंग स्नान. उटणे याला आयुर्वेदीय मान्यता आहे. नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद, मसूर डाळ, जटामासी, वाळा इ. औषधीचे हे चूर्ण. या उटण्याचे लेपन करुन नंतर होणारे हे स्नान शरीर.. मन टवटवीत.. प्रफुल्लीत करणारे.*

        *यानंतर नववस्त्रे परिधान करुन देवपूजा होणार. दिवाळी फराळाचा नैवेद्य दाखवला जाणार. वर्षभर आरोग्यासाठी गरजेचे हे अभ्यंग स्नान व्हावे म्हणून आज अभ्यंग स्नान करणारा नरकात जाणार नाही हा कृष्ण वरदानाचा श्रद्धा भाव जोडला गेलाय.* 

        *आमच्या पुराणकथा सदैव.. प्रेरणादायी. प्रत्येक युगात देव आणि दानव वृत्ती असणारच. दुर्जनांना अस्त्र शस्त्र शक्ती लाभते तेव्हा ते नेहेमीच जन सामान्यांना वेठीस धरतात.*

        *एखाद्या खेळात विजय प्राप्त झाला तरीही लोकं आनंदाने जल्लोष करतात. मग जेव्हा अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या जनतेची त्यातून कायमची सुटका होते.. अत्याचारी दानवाचा अंत होतो तेव्हा तर आनंदाला पारावर नसतो. त्रेता युगात रावण संपला म्हणून श्रीरामाच्या स्वागताला दिवाळी साजरी झाली.*  

        *व्दापार युगात प्रागज्योतिष्यपूर राज्यातील नरकासूर दैत्याने अत्याचाराचा कळस गाठला होता. सोळा सहस्त्र निरपराध स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. त्यांच्या मुक्ततेसाठी श्रीकृष्णानं सत्यभामेकडून त्याला यमसदनी धाडले. अन्यायाने जीणे नकोसे झालेल्यांचा हा स्वातंत्र्य दिनच.*

        *नरकासूराच्या अत्याचाराच्या बळी पिडीतांचा उद्धार व्हावा, बंदिवान स्त्रियांना समाजात सन्मान मिळावा म्हणून श्रीकृष्णानं त्यांना आपले नाव देत त्यांना संरक्षण दिले. असूर ही वृत्ती आहे. सामान्याच्याही मनात ती उसळी घेते तेव्हा तो पण असूर होतो.* 

        *या नरकासूराचा अंत होताच जनतेने मुक्त श्वास घेत आनंदोत्सव केला. लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशवाट उजळली, म्हणून आजही मनोमनीचा अंधार नष्ट होण्यासाठी "तमसो मा ज्योर्तिगमय" हे वरदान मागायचे. भारतीय संस्कृतीचा दिपोत्सव शांत.. सुसंस्कृत.. आनंदी आदर्श जीवन कसे जगावे हे शिकवतो.*

        *नरकासुरासह सगळ्याच असुरांचे निर्दालन करुन भक्त कल्याण करणाऱ्या श्रीकृष्णाला वंदन करुया.* .

▪️▫️▪️▫️▪️▫️▪️

        *भारताचा आज पर्यंत झालेला विकास.. सगळ्याच क्षेत्रातील गगनभरारी.. साधनसंपत्ती, नागरिकांचे सुख आणि मुख्य म्हणजे देशातील शांतता.. एकात्मता हे शेजारी देशांना डोळ्यांत सलते. मग ते देशावर आक्रमणाचा सतत अयशस्वी प्रयत्न करतात.*

        *आमची भूमी बळकावणे शत्रूला आजवर शक्य झालेले नाही.. आणि होणारही नाही. आमचे शूर सैनिक सीमेवर अहोरात्र अखंड सावध राहून जागता पहारा ठेवतात. आमचे वीर सैनिक प्रतिकूल हवामान जीवघेणी थंडी.. वादळवारा.. पाऊस कशाचीही पर्वा न करता लढतात. प्रसंगी देशासाठी सर्वोच्च असे बलिदानही देतात.*

        *देशात दिवाळी आनंदाने संपन्न होताना देशवासीयांनाही याची तेवढीच जाण आहे. सैनिकांच्या पराक्रमाने त्यांचा उर भरुन येतो. सारे देशवासी सैनिकांविषयी कृतज्ञ आहेत. सैनिकांविषयी सार्थ अभिमान वाटतो. सैनिकांविषयी देशवासियांना प्रेम आहे. या पराक्रमी सैनिकांना शतशः वंदन. दिवाळीच्या शुभेच्छा !!*

        *आपण आहात म्हणून आम्ही आहोत.. आमची ही सुखद.. हर्षोल्हासी दिवाळी साजरी होत आहे.*

*वंदे मातरम्.. !!*

*🇮🇳 जयहिंद 🇮🇳*

              

🌸🔱🌷🌺🙏🌺🌷🔱🌸

  

  *धीर धरि धीर धरी*

  *जागृत गिरीधारी*

  *तारितसे भाविकांस*

  *तोच चक्रधारी ॥*


  *अढळ पदी अंबरात*

  *बसविले धृवाला*

  *संकटात पीतांबर*

  *दिला द्रौपदीला*

  *दिधली वैकुंठपेठ*

  *सकल गोकुळाला*

  *ऐसा दाता थोर*

  *कुंजवन-विहारी ॥*


  *होसी का भयकंपित*

  *धरसि का शंका ?*

  *गाजतसे वाजतसे*

  *तयाचाच डंका*

  *'जय गोविंद जय मुकुंद*

  *जय जय सुखकारी' ॥*


⚛️🪔🌸🔆🪔🔆🌸🪔⚛️


  *गीत : विद्याधर गोखले*  ✍️

  *संगीत : पं. राम मराठे*

  *स्वर : पं. वसंतराव देशपांडे*

  *नाटक : मेघमल्हार*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-३१.१०.२०२४-*


🌻🌸🪔🔆🌺🔆🪔🌸🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi