Thursday, 3 October 2024

जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 

बुलढाणादि. 3 : खामगांव येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानआळंदीअंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

खामगांवमधील घाटपुरी येथील श्री.जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधवआमदार आकाश फुंडकरआमदार संजय गायकवाडअयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजसंस्थानचे अध्यक्ष पंकज केलाउपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टडसंस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले, यावेळी संस्थांनच्यावतीने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला.

००००


 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi