Sunday, 28 July 2024

पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या नेमबाज मनू भाकर हीचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या नेमबाज

मनू भाकर हीचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

            मुंबईदि. 28 :- "फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे. मनू भाकर हिने जिंकलेले कांस्यपदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने मनू भाकर हीचे  मनःपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात भारतीय खेळाडू अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेलअसा मला विश्वास आहे.  ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहेहे सुद्धा या पदकाचे वैशिष्ट्य.. मनू भाकर हिचे पुन:श्च अभिनंदन. भारतीय ऑलिम्पिक पदकाला अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी  मनापासून शुभेच्छा...," अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला स्पर्धेतील पहिले पदक जिंकून देणाऱ्या कांस्यपदक विजेत्या नेमबाज मनू भाकर हिचे अभिनंदन केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi