Wednesday, 8 May 2024

दिलखुलास' कार्यक्रमात बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात बीडच्या जिल्हाधिकारी

दीपा मुधोळ- मुंडे यांची मुलाखत

 

            मुंबई, दि. 8 : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बीड जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी  बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे  यांची मुलाखत घेण्यात आली आहे.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात, शुक्रवार 10 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            बीड जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघ, लोकसभा  निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबतचे नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi