Friday, 19 April 2024

39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक दुसऱ्या दिवशी 3 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक दुसऱ्या दिवशी 3 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 

बीड, दि.19  : (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज 3  उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. या तीनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला.

              39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज 03 अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले .  शेख तौसीफ अब्दुल सत्तार, सादेक इब्राहिम शेख, उदयभान नवनाथ राठोड अशी या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत.

 लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नव्हते.  गुरुवारी 39 इच्छुक उमेदवारांना 92 नामनिर्देशन पत्रांची वाटप झाले होते. आज शुक्रवारी 30 इच्छुक उमेदवारांना  68 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले आहे. असे एकूण 69 इच्छुक उमेदवारांना 160 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

            39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

            सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

 

00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi