Friday, 8 March 2024

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ चा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या दुवा’ चा वाढदिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

 

        कोल्हापूरदि.8 (जिमाका): मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या "दुवा" या चिमुकलीचा महिलादिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या 'शिवराज्य भवनकोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आला.

            यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेजिल्हाधिकारी अमोल येडगेजिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखेसाई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये 13 जून 2023 मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या 'शासन आपल्या दारीकार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी मुलीचे नाव दुवा असे ठेवल्याचे तिची आई फरिन मकुबाई यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले होते.

            आज याच "दुवा" चा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिची आई फरिन मकुबाई यांनी व्यक्त केल्या.

**


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi