Wednesday, 20 December 2023

जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार

 जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार


- मंत्री गिरीश महाजन


 


            नागपूर, दि. २०: राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. तसेच जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसविण्याची प्रलंबित कार्यवाही येत्या दोन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली.


            सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, शासकीय आश्रम शाळा, लालमाती, ता. रावेर येथे सन २०११ मध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आले होत. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा विकास या योजनेतून रावेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळांवर सौर यंत्रणा बसविण्यात आले होते. मात्र, शासकीय आश्रम शाळा लालमाती, ता. रावेर येथील सौर यंत्रणा नैसर्गिक आपत्तीमुळे (वादळामुळे) काही युनिट बंद पडले आहेत. ही बंद युनिट तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


            यावेळी सदस्य प्राजक्त तनपुरे, प्रकाश आबिटकर आणि ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न विचारले. 


0000


दीपक चव्हाण/विसंअ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi