Tuesday, 19 December 2023

जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई

 जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई

- दिलीप वळसे पाटील

          नागपूर, दि. 18 : अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्या प्रकरणी सहकार आयुक्तांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जि.अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

            या संदर्भात सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी      श्री. वळसे पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकरसतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

            यावेळी श्री वळसे पाटील म्हणालेजिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकअमरावती या बॅकेबाबतच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी  10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये तपासणीसाठी प्रादेशिक उपसंचालक, (साखर)अमरावती यांची नियुक्ती केली असून त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी तपासणी अहवाल  सादर केला आहे. या अहवालामध्ये कर्ज मंजूर प्रकरणांमध्ये पुरेसे तारण न घेणेकर्जदाराची क्षमता न पाहता कर्ज देणे, संपूर्ण कर्ज रक्कम उचल देणे, कमी व्याजदराने कर्ज मंजूर करणेशासन मान्यता न घेता एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविणे इत्यादीमध्ये अनियमितता आढळून आल्याने या बँकेची चौकशी करण्यासाठी दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशान्वये सहकार आयुक्तांनी  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जि. अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषीं असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi