Wednesday, 22 November 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

 

            कोल्हापूरदि. 21 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर येथे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला भेट देऊन सहकुटुंब दर्शन घेतले. तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री श्री. शिंदेखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वागत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेआमदार प्रकाश आबिटकरजिल्हाधिकारी राहुल रेखावारविशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीपोलीस अधीक्षक महेंद्र पंडितकोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मीमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलमाजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यामध्ये सर्वांना सुखसमृद्धी लाभावी, अशी प्रार्थना देवीकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi