वृद्ध नाही, ज्येष्ठ आहोत,
अनुभवाने श्रेष्ठ आहोत !
अजून पुरते पिकलो नाही,
थांबण्याइतके थकलो नाही !
कमी झालाय वेग जरी,
ईर्ष्या तशीच आहे तरी !
पुन्हा फुलवू वसंत,
कुठली कसली नाही खंत !
दम घेण्या स्वल्पविराम,
नका समजू पूर्णविराम !
ऑगस्ट २१,
ज्येष्ठ नागरिक दिवस
👴
No comments:
Post a Comment