Sunday, 20 August 2023

पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत घाटकोपर येथे आयोजितमहाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

 पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत घाटकोपर येथे आयोजितमहाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ


            मुंबई, दि.१९:- 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या मागण्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 'महा आरोग्य शिबीर' आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज साईनाथ नगर रोड, गणेश मैदानासमोर, मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह(साईनाथ मेटरर्निटी होम), घाटकोपर, पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी आमदार राम कदम उपस्थित होते.

            या शिबिराद्वारे प्राथमिक आरोग्य चाचण्यांसह नागरिकांना मोफत औषधेसुद्धा उपलब्ध करुणदेण्यात आली आहेत. विभागाकडून लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तसेच या उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांचे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या मोफत तपासणीचा लाभ स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला असल्याबद्दल मंत्री श्री.लोढा यांनी समाधान व्यक्त केले.


                                                ***

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi