Tuesday, 18 April 2023

सर्वगुण संपन्न मेथी,

 *मेथी*


भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये  मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/K5QdAp4Y8J7GrjUFVxAuu3

आहारात मेथीचा समावेश जरुर करा-


मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते-


काही संशोधनात असे आढळून आले आहे की मेथीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड चे शोषण टाळले जाते.


ह्रदयविकाराचा धोका कमी होतो-


मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे ह्रदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियमुळे सोडीयमच्या कार्यावर नियंत्रित राहते ज्यामुळे हुदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतात.


रक्तातील साखर नियंत्रित राहते-


मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.तसेच मेथीमधील अमिनो असिड या घटकामुळे इन्शूलीनच्या निर्मितीस देखील चालना मिळते. जाणून घ्या ‘हळदी’ने ठेवा रक्तातील साखर नियंत्रणात !


पचनप्रक्रिया सुलभ होते-


मेथीमध्ये फायबर व अन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते.कधीकधी अपचन अथवा पोटदुखी असल्यास मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो.सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास बद्धकोष्ठतेमध्ये देखील फायदा होतो.


छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो-


छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा.यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा. नक्की वाचा ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी  !


वजन कमी करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो-


वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशी पोटी चाऊन खा.मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात भूक कमी लागते.ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठता येते. जाणून घ्या वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना


ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी-


ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.तसेच खोकला व घसा खवखवत असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.


स्तनपान करणा-या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते-


मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते.त्यामुळे स्तनपान करणा-या महिलांना मेथी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.


बाळाचा जन्म सुलभ होतो-


मेथीच्या सेवनामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी गर्भाशयाच्या आकुंचन व प्रसरणाला मदत होते.त्यामुळे प्रसव वेदना कमी होतात.मात्र अधिक प्रमाणात मेथी सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका असल्यामुळे गर्भवती महीलांनी मेथीचे सेवन करताना सावध रहावे.


महिलांच्या मासिक पाळीमधील समस्या कमी होतात-


मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन,आयसॉफ्लॅवेन्स,अॅस्टोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो.त्याचप्रमाणे मेथीमधील या घटकांमुळे मॅनोपॉजमध्ये होणा-या मूड बदलणे व उष्णतेच्या समस्येमध्ये देखील आराम मिळतो.मासिक पाळीच्या काळामध्ये तसेच गरोदर व स्तनपान करणा-या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते.आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते.मात्र या भाजीतील लोहाचे शरीरात शोषण होण्यासाठी त्यामध्ये टोमॅटो व बटाट्याचा वापर देखील करा.


कोलन कॅन्सर टाळता येतो-


मेथीमधील फायबर या घटकांमुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.त्यामुळे कोलन कॅन्सर टाळण्यास मदत होते.


त्वचेचा दाह अथवा चट्टे कमी होतात-


मेथीमधील विटामिन-सी या अॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचा भाजणे,गळू अथवा इसबामध्ये होणारा त्वचेचा दाह कमी होतो.तसेच जखमा लवकर भरुन निघतात.यासाठी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट जखमेवर लाऊन त्यावर स्वच्छ कापडाची पट्टी बांधा.


त्वचा विकार कमी होतात-


चेह-यावरील ब्लॅकहेड्स,पिम्पल्स,सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक लावल्यास चांगला फायदा होतो.यासाठी मेथीचे दाणे उकळलेल्या पाण्याने चेहरा धुवा अथवा ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट वीस मिनिटे चेह-यावर लावा व नंतर चेहरा स्वच्छ धुवा.


केसांच्या समस्या कमी होतात-


मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.केस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा.मेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi