Tuesday, 18 April 2023

जिल्हा परिषद मधील 457 पदे भरली जाणार

 जिल्हा परिषद मधील 457 पदे भरली जाणार

 

       उस्मानाबाद,दि.18(जिमाका)उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा कोटयातील रिक्त पदामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील पदांचा सुधारीत आकृतीबंध मंजूर असल्याने व आरोग्य विभाकडील रिक्त असलेल्या विविध संवर्गातील 100 टक्के पदे तर उर्वरीत विविध विभागाकडील सुधारीत आकृतीबंध मंजूर नसल्याने अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त असलेल्या पदापैकी 80 टक्के पदे जाहिरातीद्वारे भरणेसाठी जाहिरात अंतिम टप्यात असून शासनाचे मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे पदभरतीची कार्यवाही प्रगतीत आहे.

             शासन निर्णय दि.16 मार्च .2023 अन्वये दि.31 डिसेंबर,2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिध्द होणाऱ्या जाहिराती करीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष  शिथिलता देण्यात आली आहे.तसेच माहे मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे या पूर्वी अर्ज केलेले /भरलेले आहेत अशा सर्व उमेदवारांना दि.31 डिसेंबर,2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातीकरीता अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे.तसेच मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परिक्षेसाठी कायम ठेवण्यात आलेली आहे.

         जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने आय.बी.एसकंपनीमार्फत अर्जपोर्टल विकसित करण्याचे काम कंपनी स्तरावर सुरु करण्यात आलेले आहे. अर्ज पोर्टल विकसीत होताच शासनाकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनंप्रमाणे जिल्हा परिषद उसमानाबाद कडील विविध संवर्गातील सरळसेवा भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्याची कार्यवाही अनुसरण्यात येत आहे.

             जिल्हा परिषद उस्मानाबाद कडील सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने माहिती व शंका निरसन करण्याकरीता जिल्हा परिषद  सामान्य प्रशासन विभागया कार्यालयामध्ये 02472-223388 हा क्रमांक हेल्पलाईन क्रमांक म्हणून उपलब्ध करण्यात आलेला आहे.उमेदवारांनी भरतीसंदर्भात माहिती तसेच त्यांच्या शंका निरसन करण्यासाठी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15) उपरोक्त हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी,राहूल गुप्ता यांनी केले आहे.

*****

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi