Monday, 20 February 2023

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 



दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यांच्या कार्याला वंदन व स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंत्रालयात या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून दर्पणकारांना वंदन केले.


०००


श्रीमती श्रध्दा मेश्राम/संस/



 


वृत्त क्र. 589


नवी दिल्ली येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन


 


            नवी दिल्ली, 20 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 


            कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


००००


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi