Monday, 20 February 2023

दिलखुलास' कार्यक्रमात अजय भोसले यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात अजय भोसले यांची मुलाखत


            मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांची मुलाखत 21 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


                जगभरात 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. आपली संस्कृती आणि मातृभाषेचा जागर या दिवसाच्या निमित्ताने करण्यात येतो. भारतासारख्या विविध संस्कृती आणि भाषा असलेल्या देशात मातृभाषा दिवस बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणारा ठरतो. युनेस्कोने जाहीर केलेला जागतिक मातृभाषा दिवस हा आपल्या मातृभाषेविषयी आत्मियता निर्माण करणारा आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्व ओळखून श्री. भोसले यांनी मातृभाषेच्या संवर्धन, प्रचारासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी घेतली आहे.


००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi