Saturday, 12 November 2022

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ ची


महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ ची

अंतिम उत्तरतालिका प्रसिद्

            मुंबई दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१" पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर - कर सहायक)" (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात क्रमांक ५९ / २०२२ ला अनुसरुन दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१"च्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व सह सचिव यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

0000

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१.

पेपर क्रमांक- २ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्

            मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २० ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१" पेपर क्रमांक- २ (स्वतंत्र पेपर- दुय्यम निरीक्षक) " (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात क्रमांक ६०/२०२२ ला अनुसरुन दिनांक २० ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१" च्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यापरीक्षा नियंत्रक व सह सचिव यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi