Tuesday, 31 May 2022

 होळीवरून मारल्या गेलेल्या,

झांज्या-पुंज्या पहेलवानांची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २१)

रायजांभूळ ओढा व हेंकळदरा परिसराला लागून झांज्या-पुज्या नावाच्या दोन टेकड्या उभ्या आहेत. झांज्या-पुंज्या या नावाची कहाणी एका महिलेकडून समजली. पाराळा, भादली, वडजी परिसरातील गावात होळी सणाबाबत एक समज होता. होळीचा विस्तव जो गाव घेऊन जाईल; त्या होळीच्या गावची ’लक्ष्मी’ (दौलत-संपत्ती-बरकत) दुसऱ्या गावात विस्तवाबरोबर जात असे. म्हणून होळी पेटली की, रात्रभर पहारा असे. या पहारेकरी पहिलवानांना सणासाठी गावाच्या वतीने ’खुराक’ दिला जात असे. एका प्रसंगात होळीचा विस्तव नेताना दोन्ही गावांची हाणामारी झाली. त्यात झांज्या-पुंज्या नावाचे दोन पहेलवान मारले गेले. हे सारे आदिवासी-बलुतेदार-दलित होते. त्यांच्या नावाने या दोन टेकड्या ओळखल्या जातात.

हेंकळदरा, टपक्याचे लवण, धारकडा, नकटीचा ओहोळ... अशा टापूंच्या या गोष्टी. त्या कदाचित तुमच्या गावातील वेगवेगळ्या ठिकाणांची आठवण करून देईल... बघा, काही आठवतंय का?

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही एकविसावी गोष्ट.)

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Parala-Tapu2

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)



--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi