जय महाराष्ट्र' कार्यक्रमात
संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान यांची मुलाखत
मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त सुरक्षा सेवा ( कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार, दि. ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल...
यूट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सव्हिसेस) परीक्षेचे स्वरूप, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी आवश्यक संदर्भ साहित्य, शारीरिक चाचणी आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. अपूर्व पडघान यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे
No comments:
Post a Comment