Monday, 20 September 2021

 *तर्क...!* 😎


कोर्टात एक अजब खटला चालू होता, एका खेडूताने तोफेच्या परवान्याचा अर्ज केला होता,आणि हे पाहायला हजारो लोकं आणि मीडिया कोर्टात हजर होते. 


न्यायाधीश :- तुम्ही तोफेच्या परवान्याचा अर्ज पुर्ण शुद्धीत असताना दिलाय..? 😐


खेडूत :- हो न्यायाधीश महाराज. 😚


न्यायाधीश :- तुम्ही न्यायालयाला ही तोफ कुठे आणि कुणावर चालवणार आहात हे सांगू शकाल का...?


खेडूत :- न्यायाधीश महाराज, मागल्या साली मी 

आपल्या ग्रामीण बँकेतून 1 लाख रुपयांच्या बेरोजगार लोन साठी अर्ज केला ,बँकवाल्यांनी सगळ्या चौकशा करून मला 10 हजार रुपयांचं लोन दिलं... 


त्यानंतर माझ्या बहिणीच्या लग्नात मी रेशनिंग मधून 100 किलो साखरेसाठी अर्ज केला आणि मला रेशनिंग मधून फक्त 10 किलो साखर मिळाली...


काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं माझी पिकं पुरात वाहून गेली...कृषीअधिकाऱ्यांनी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली... न् खात्यात 5 हजार रुपयेच आले. 


आता मला सरकारी कामकाजाची चांगल्या प्रकारे माहिती झालीये, खरं तर मला वानरं पळवायसाठी बंदूकीचा परवाना पायजेल होता पण मी विचार केला की जर मी बंदुकीच्या परवान्याचा अर्ज केला तर तुम्ही गुलेरीचा परवाना देऊ नये , याकरता मी तोफेचा अर्ज केला.. 


आता काय करायचं...?


😂😂😂😅👍

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi