Wednesday, 18 August 2021

 उत्तर मुंबई विभागातील ज्येष्ठ नागरिकांना

राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

 

       मुंबईदि. 18 : मुंबई उपनगर जिल्ह्यातीलउत्तर मुंबईमधील सहा मतदारसंघात राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे दि. 25262730 ऑगस्ट व 12 सप्टेंबरया दिवशी ज्येष्ठ नागरिकांना साधने आणि उपकरणे यांचे नि:शुल्क वाटप करण्यासाठी चाचणी शिबिर खासदारगोपाल शेट्टी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना छडीवॉकरव्हिलचेअरकानाचे मशीनचष्मेकृत्रिम दातव्हिल चेअर कमोड सहितट्रायपॉड व पेट्रापॅाड इ. यंत्रे व उपकरणे देण्यात येतील. तरी या विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले सरकार केंद्र (Common Sservice Centre) येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेत नावनोंदणी करावी. नोंदणीसाठी  आधार कार्डरेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला व  पासपोर्ट साईज फोटो कागदपत्रे अनिवार्य आहे.

         तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर श्री. प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi