Wednesday, 18 November 2026

मुंबई वॉटर मेट्रोसह महत्वाकांक्षी सागरी प्रकल्पांना गती द्यावी

 मुंबई वॉटर मेट्रोसह महत्वाकांक्षी सागरी प्रकल्पांना गती द्यावी

-बंदरे मंत्री नितेश राणे

  • महाराष्ट्र सागरी मंडळ संचालक मंडळाची ८९ वी बैठक
  • प्रकल्प रखडवणाऱ्यांना आता मुदतवाढ नाही
  • काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची अंतिम संधी

 

मुंबई, दि. १८ : दीर्घकाळ रखडलेल्या बंदर प्रकल्पांना अखेरची एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळ संचालक मंडळाने आढावा बैठकीत घेतला. या कालावधीत काम पूर्ण न केल्यास संबंधित प्रकल्प आपोआप रद्द होईल. त्यानंतर मुदतवाढीचा प्रस्ताव मंडळासमोर आणू नये असे मंडळाचे अध्यक्ष आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सागरी मंडळ संचालक मंडळाची ८९ वी बैठक महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीला परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., वित्त विभागाचे उपसचिव सु. सि. पाटील उपस्थित होते.

काही कंपन्यांना २०१८ मध्ये देण्यात आलेल्या प्रकल्पांची मूळ पूर्णता मुदत २०२० पर्यंत होती. कोविड कालावधी आणि पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेमुळे या प्रकल्पांना तीन ते चार वेळा मुदतवाढ मिळाली आहे. प्रकल्पांना एसईआयएएची पर्यावरणीय मंजुरी मिळाली असून, खारफुटीविषयक उच्च न्यायालयीन परवानगीची प्रक्रिया प्रलंबित आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप बी. यांनी दिली.

यावर पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेचा आधार घेऊन प्रकल्प अनिश्चित काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. दीर्घ विलंबामुळे प्रकल्पाची किंमत, व्यवहार्यता आणि सार्वजनिक उपयोगिता प्रभावित होत असल्याने मुदतवाढीला निश्चित मर्यादा असणे आवश्यक असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

मुंबई वाटर मेट्रो हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रक्रियांना गती द्यावी असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात

 इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात

दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार

 दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी

विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. १८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र कुंथुगिरीसाठी ९ कोटी २० लाखांहून अधिक निधी

 श्री क्षेत्र कुंथुगिरीसाठी ९ कोटी २० लाखांहून अधिक निधी

हातकणंगले तालुक्यातील मौजे आळते येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ९ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाहनतळाचे काँक्रिटीकरण, उर्वरित संरक्षण भिंतीचे बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत.

 

याशिवाय तीन हजार व्यक्तींची क्षमता असलेली आरसीसी सत्संग भवन इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमुळे धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांना प्रशस्त सुविधा उपलब्ध होणार आहे.या निर्णयामुळे श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून, तीर्थक्षेत्र परिसराचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे.

0000


 

 


 


श्री क्षेत्र बाहुबलीसाठी ९ कोटींचा निधी

 श्री क्षेत्र बाहुबलीसाठी ९ कोटींचा निधी

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कसबा कुंभोज येथील श्री क्षेत्र बाहुबलीच्या विकासासाठी ९ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये तीर्थक्षेत्र परिसरात पाथवे तयार करणे, शाळेच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व काँक्रिटीकरण करणे, भाविकांसाठी बसण्याकरिता बाकड्यांची व्यवस्था करणे, प्रशासकीय कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांच्या बाजूने सोलर स्ट्रीट लाईट उभारणे आदी कामांचा समावेश आहे.तसेच माईन कुंडी ते मुख्य मंदिराला जोडणाऱ्या अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकामही करण्यात येणार आहे. या सुविधांमुळे तीर्थक्षेत्र परिसरातील अंतर्गत वाहतूक आणि भाविकांची ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार · १८ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

 कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

·         १८ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

 

मुंबई, दि. १८ : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची श्रद्धास्थाने असलेल्या श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यातील एकूण १८ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

 

 विधान भवन येथील कॅबिनेट हॉल येथे झालेल्या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार डॉ. अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन सहभागी झाल्या होत्या.

बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासोबतच

 बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना

            मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासोबतच वनालगतच्या शेतकऱ्यांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि एमआयडीसी यांच्या समन्वयातून बांबू लागवड व त्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येईल असे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

            संरक्षित क्षेत्रालगत मोठ्या वृक्षांची तोड थांबवून बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे. उसाच्या तुलनेत बांबूला निम्मे पाणी लागते आणि त्यापासून इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. एमआयडीसीने बांबू लागवडीसाठी जागा भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांना वार्षिक भाडे द्यावे आणि त्या माध्यमातून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 


Featured post

Lakshvedhi