Sunday, 27 September 2026

दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

 दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

 

            मुंबई, दि. २६ : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये दहा दिवसांत सुमारे २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

            मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे भाविकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.

 

            भाविकांना आरोग्य तपासणीसाठी दूर जावे लागू नये आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या भाविकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित रुग्णालयांकडे पाठविण्यात आले.

 

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले. पुढील उपचारांची गरज असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करूननिर्यात प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सुविधा कक्ष

 निर्यात प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सुविधा कक्ष

 

            सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमस्थळी परदेशी व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी), बँकिंग संस्था, विमा सेवा प्रदाते, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य मंच तसेच भारतीय डाक विभागाचे विशेष मार्गदर्शन व सुविधा कक्ष उपलब्ध असतील. निर्यात प्रक्रिया, व्यापार वित्तपुरवठा, विमा, वाहतूक व वितरण व्यवस्था, बाजारपेठ प्रवेश तसेच डिजिटल व्यापार याबाबत सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य -१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डद्वारेच

 ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य

-१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डद्वारेच

 

            मुंबई, दि.  २६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.

१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत (Active) NCMC कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.

विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना NCMC कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे.

NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी भीम ॲप (BHIM App) द्वारे Top-up करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करून Top-up करता येणार आहे.

दरम्यान, आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.

सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने NCMC कार्ड प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

000

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी सक्रिय सहभाग घ्यावा

 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी सक्रिय सहभाग घ्यावा

            कोल्हापूर व परिसरातील जिल्ह्यांमधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त तथा एमएसएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

 

            आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट संवाद साधणे, जागतिक बाजारपेठेच्या गरजा समजून घेणे, नवीन निर्यात बाजारपेठांचा शोध घेणे आणि दीर्घकालीन व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीनिर्यात प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सुविधा कक्ष

 निर्यात प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सुविधा कक्ष

 

            सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमस्थळी परदेशी व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी), बँकिंग संस्था, विमा सेवा प्रदाते, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य मंच तसेच भारतीय डाक विभागाचे विशेष मार्गदर्शन व सुविधा कक्ष उपलब्ध असतील. निर्यात प्रक्रिया, व्यापार वित्तपुरवठा, विमा, वाहतूक व वितरण व्यवस्था, बाजारपेठ प्रवेश तसेच डिजिटल व्यापार याबाबत सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

MSSIDC to Organise 7th Reverse Buyer Seller Meet in Kolhapur to Strengthen Global Market Access for MSMEs

 MSSIDC to Organise 7th Reverse Buyer Seller Meet in Kolhapur to Strengthen Global Market Access for MSMEs

 

            Mumbai, 26 September 2026: The Maharashtra Small Scale Industries Development Corporation Ltd. (MSSIDC), the State Nodal Agency for the World Bank-supported Raising and Accelerating MSME Performance (RAMP) Programme, in collaboration with the Federation of Indian Export Organisations (FIEO), will organize the 7th Reverse Buyer Seller Meet (RBSM) on 29th and 30th September 2026 at Sayaji Hotel, Kolhapur.

 

            The two-day international business networking platform is aimed at connecting Maharashtra’s Micro, Small and Medium Enterprises (MSMEs) with overseas buyers, enabling them to explore new export opportunities, expand into international markets, and forge long-term business partnerships.


कोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर रोजी एमएसएसआयडीसीतर्फे सातवी रिव्हर्स बायर-सेलर मीट

 कोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर रोजी एमएसएसआयडीसीतर्फे

सातवी रिव्हर्स बायर-सेलर मीट

 

आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना थेट व्यावसायिक संवादाची संधी

 

            मुंबई, दि. २६ : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता उन्नती व गतीवर्धन’ (आरएएमपी) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित (एमएसएसआयडीसी) हे राज्य नोडल संस्थेच्या भूमिकेत कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत एमएसएसआयडीसी आणि भारतीय निर्यात संघटना महासंघ (एफआयईओ) यांच्या सहकार्याने सातवी ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’ अर्थात खरेदीदार-विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळावा २९ व ३० सप्टेंबर २०२६ रोजी सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi