Monday, 14 September 2026

विदर्भातील विपुल खनिजसंपत्तीचा विशेषतः गडचिरोलीतील लोहखनिज साठ्यांचा उल्लेख करताना

 विदर्भातील विपुल खनिजसंपत्तीचा विशेषतः गडचिरोलीतील लोहखनिज साठ्यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या भागात सुमारे ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास ५० एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) पोलाद निर्मिती क्षमता विकसित केली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील नव्या मिशनअंतर्गत प्रस्तावित पहिल्या आठ कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांपैकी चार प्रकल्प विदर्भात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

गडचिरोलीसोबतच चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये नव्या औद्योगिक परिसंस्थेचा विकास होऊ शकतो. ग्रीन स्टील, स्वच्छ तंत्रज्ञान आणि सुधारित लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण होतील, असे फडणवीस म्हणाले.

 

            आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप शिरखेडकर यांनी प्रास्ताविकात खाण क्षेत्रासमोरील गंभीर आव्हानांवर प्रकाश टाकला. महत्वपूर्ण खनिजे, नवे तंत्रज्ञान आणि खाणी बंद करण्याची प्रक्रिया यांसारख्या विषयांवर व्यापक चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खनन व वापरासाठी सक्षम परिसंस्था उभारण्यासोबतच कौशल्य विकास केंद्रे, लवाद सुविधा आणि चाचणी केंद्रांची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

    

पुढील २० वर्षांत खाण क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान देणार · खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

 विदर्भाची मायनिंग व ग्रीन स्टील हब बनण्याच्या दिशेने वाटचाल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         पुढील २० वर्षांत खाण क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान देणार

·         खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

 

            नागपूर, ११ : विदर्भामध्ये मायनिंगच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनण्याची क्षमता असून, ‘विकसित भारत @२०४७च्या संकल्पनेत विदर्भ महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, त्यासोबतच गडचिरोली येथे मायनिंग क्षेत्रात नवीन इको सिस्टिम तयार होत असून क्लीन ग्रीन स्टील रिव्होल्यूशन देशात प्रथमच होत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या नागपूर लोकल चॅप्‍टरतर्फे हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे आयोजित दोन दिवसीय खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशन व मायनिंग फॉर विकसीत भारत @2047’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्‍या उद्घाटन प्रसंगी  मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

 

            मायनिंग क्षेत्रातील नवीन  संशोधन या विषयावरील प्रदर्शनीचे  उद्घाटन  मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)चे अध्यक्ष अभियंता मनीष कोठारी अध्यक्षस्थानी होते.

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार · राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनांस आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार pl share

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

·         दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

·         राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनांस आणि स्माईल ट्रेन इंडियायांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार

            मुंबई, दि. ११ : प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्याचे जीवन आनंददायी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या संकल्पनेतून दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने  राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडियायांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा  करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.

            जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू यामुळे  निरागस बालकांच्या चेह-यावरील हसू मावळून जाते. आपल्या मुलाच्या चेह-यावर एकदा तरी तरी हसू बघावे यासाठी बालकांच्या आई-वडिलांची होणारी तगमग आणि त्यासाठी त्यांचे रुग्णालयाचे उंबरठे झिजवणे डोळ्यात पाणी आणते . शिवाय त्याचा उपचार खर्च मोठा असल्याने तो प्रत्येकच पालकाला परवडणारा नाही.  याची जाणिव असणा-या मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टीने  विचार करून अशा पालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता राज्यातील एकही बालक दुभंगलेले ओठ व टाळू असलेले राहणार नाही याची काळजी राज्याचा पालक या नात्याने मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

            या सामंजस्य कराराद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) तपासणीमध्ये आढळलेल्या अशा बालकांना जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या औपचारिक संदर्भपत्राद्वारे स्माईल ट्रेन इंडियाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येईल. संबंधित जिल्ह्यांना विशिष्ट भागीदार रुग्णालयांशी जोडण्यासाठी दोन्ही संस्था समन्वयाने काम करणार आहेत.

            दुभंगलेले ओठ व टाळू यांच्या उपचारांविषयी अधिक माहितीसाठी १८००१०३८३०१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            या उपक्रमांतर्गत बालकांना शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, औषधे, पोषणविषयक सेवा, दंतव्यंगोपचार, वाचा उपचार तसेच गरजेनुसार प्रवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्णांचे भोजन, निवास आणि प्रवासावरील खर्चही स्माईल ट्रेन इंडियाकडून करण्यात येईल. शस्त्रक्रियापूर्व तपासण्या आणि उपचारांशी संबंधित शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीवरील खर्चाची जबाबदारीही संस्थेकडे राहणार आहे.

            बालकांची ओळख व उपचाराची आवश्यकता निश्चित करण्यासाठी स्माईल ट्रेनची भागीदार रुग्णालये, आरबीएसके पथके आणि जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रांच्या (डीईआयसी) समन्वयाने तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांची ओळख पटविण्यासंदर्भात शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शनही दिले जाईल.

            उपचारासाठी रुग्ण पाठविणे, त्यांच्या नोंदी ठेवणे आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मान्यताप्राप्त रुग्णालयाचा प्रकल्प संचालक नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाच्या सुविधा आणि भूलतज्ज्ञांची उपलब्धता यांची खातरजमा करतील.

 

राज्यातील या १५ रुग्णालयांमध्ये होणार उपचार

या करारांतर्गत राज्यातील १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांत या व्याधीवर  उपचार उपलब्ध होतील :

१. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वर्धा

२. आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर

३. आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जळगाव

४. बेंबडे हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

५. एलिट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर

६. लहाने हॉस्पिटल, लातूर

७. मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई

८. एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे

९. पूना हॉस्पिटल, पुणे

१०. सहयोग हॉस्पिटल, गोंदिया

११. श्रीराम हॉस्पिटल, अकोला

१२. शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई

१३. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर

१४. वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक

१५. वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स), कोल्हापूर.

           

 

            कार्यक्रमाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांच्यामार्फत या प्रकल्पाचे नियमित त्रयस्थ मूल्यमापन करण्यात येईल.

000


 



प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार

 प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा  अधिक सक्षम होणार

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


पाच हजार लालपरीबसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण



      मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच हजा लालपरीबसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्ससारख्या नामांकित आणि विश्वासार्ह संस्थेने सादर केला आहे. त्यामुळे बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, नव्या पाच हजार लालपरीबसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची लोकवाहिनीअसलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. नव्या बसेसमुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल, बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येईल. जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बसेस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या ताफ्यामुळे प्रभावीपणे मात करता येणार आहे.पुढील सहा महिन्यांत सुमारे पाच हजार हून अधिक जुन्या बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होणार आहेत.

एसटी महामंडळाने यापूर्वीच बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. 2 बाय 2 आसन व्यवस्थेच्या 2,640 लालपरीबसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर 3 बाय 2 आसन व्यवस्थेच्या तीन हजार राजमाता जिजाऊबसेस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बसेसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक तरुण, सक्षम आणि प्रवाशांच्या गरजांशी सुसंगत होत आहे.
नव्या पाच हजार बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर मागेल त्याला बसफेरीउपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बसफेरीचा फायदा झाला नाही तरी चालेल; मात्र बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी ती फेरी तोट्यात चालणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

विशेष म्हणजे, पाच हजार लालपरीबसेसचा हा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बसच्या युगातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने एसटी महामंडळाचा प्रवास अधिक वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य मिळणार आहे. लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची विश्वासू सोबती असलेल्या एसटीच्या ताफ्यात होणारी ही मोठी भर म्हणजे केवळ बसेसची संख्या वाढविणे नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर आणि दर्जेदार प्रवासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रवाशांच्या सेवेसाठीहे ब्रीद अधिक प्रभावीपणे साकार करण्यासाठी एसटी आता नव्या दमाने, नव्या तंत्रज्ञानासह आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी सज्ज होत आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

0000

Maharashtra Governor welcomes Prince Rahim Aga Khan V

 Maharashtra Governor welcomes Prince Rahim Aga Khan V

AKDN to work closely with Maharashtra universities on climate action,

 environment and micro forests

 

Maharashtra Governor Shri Jishnu Dev Varma today welcomed His Highness Prince Rahim Aga Khan V, the 50th hereditary Imam of the Shia Ismaili Muslims and Chairman of the Aga Khan Development Network (AKDN), at Maharashtra Lok Bhavan, Mumbai, on Sunday (13 September).

Thanking the Governor for receiving him, Prince Rahim Aga Khan said that the Aga Khan Development Network has been working on a Climate Action Plan for cities and implementing innovative cooling solutions in cities and towns in Maharashtra, which have brought substantial benefits to local communities.

Prince Rahim Aga Khan said that AKDN would be happy to work closely with universities in Maharashtra on environmental protection, climate action and related issues. He informed the Governor that AKDN is already undertaking initiatives in Pune, Mira-Bhayandar, Chandrapur and other places focusing on climate action, reduction of emissions and cooling solutions.

He also spoke about AKDN’s work in reviving ponds and water bodies in Vasai, which has helped in improving groundwater levels. He said the Network was committed to bringing relief to people affected by rising temperatures and global warming and to improving the quality of life of communities.

Prince Rahim Aga Khan further informed the Governor that AKDN has undertaken micro-forest initiatives at thousands of locations. He suggested that similar initiatives could be explored in universities and educational institutions across Maharashtra.

मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

 मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

 

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस नसून, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहिला आहे.

गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 गणेश ज्ञानारतीप्रदर्शनाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे गणेश ज्ञानारतीप्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे 1300 दुर्मिळ सुवर्ण, रजत, कांस्य व तांब्याची ऐतिहासिक नाणी येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा व बोधिसत्त्वाचे अवशेषही मांडण्यात आले आहेत. मुघलकालीन हिंदुस्तानाचा 1788 मधील नकाशा आणि नर्मदा नदीचा 1870 मधील नकाशाही प्रदर्शनाचे आकर्षण आहे. भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ येथे ठेवण्यात आले होते. कोल्हापूर व कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तू तसेच बुद्ध प्रतिमा यांच्यासह भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचे समृद्ध दर्शन घडविणारे असे हे प्रदर्शन होते.

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. आभार सचिव विनय गणपुले यांनी मानले.

 

Featured post

Lakshvedhi