इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६ पुरस्कार
'जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल' च्या वतीने आयोजित ५२ वा इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पुरस्कारांमध्ये विविध २७ श्रेणींचा समावेश करण्यात आला. ही कौन्सिल' भारताच्या रत्न आणि दागिने उद्योगाची सर्वोच्च संस्था असून, तिची स्थापना १९६६ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती. १०,७०० हून अधिक सदस्य असलेली ही संस्था १९९८ पासून स्वायत्त आहे. आज देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक उलाढाल, सर्वाधिक रोजगारनिर्मिती, सर्वाधिक कर भरणारी कंपनी, कट अँड पॉलिश्ड डायमंड्स, मौल्यवान धातूंचे साधे व जडवलेले दागिने, चांदीचे दागिने, रंगीत रत्न, कॉस्च्युम/फॅशन ज्वेलरी, सिंथेटिक स्टोन्स आणि लॅब-ग्रोउन डायमंड्स यांसारख्या श्रेणींचा समावेश होता.
राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्काराच्या ५२ व्या सोहळ्यात निर्यातदार, उत्पादक, बँकर्स, महिला उद्योजक आणि उद्योगाची व्यवस्था सक्षमपणे सांभाळणाऱ्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सर्वाधिक सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपनी (CSR), सर्वोत्तम नाविन्यपूर्ण विपणन व ब्रँडिंग मोहीम, परदेशातील रत्न व आभूषण विक्री, महिला उद्योजक, उद्योगाला वित्तपुरवठा करणारी सर्वोत्तम बँक, विशेष सन्मान, जीवनगौरव आणि कर्मचारी पुरस्कार अशा विविध श्रेणींमध्येही पुरस्कार प्रदान केले गेले.

