Friday, 4 September 2026

पुढील १० वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दीष्ट

 पुढील १० वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दीष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. ३ : मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.पुढील दहा वर्षांत मुंबई  झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसेच बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नरेडको' महाराष्ट्राच्या चेंज ऑफ गार्डकार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नरेडकोमहाराष्ट्र नेक्स्टजेनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रौनक बांदेलकर यांच्यासह रिअल इस्टेट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘नरेडकोने नेहमीच बांधकाम क्षेत्रातील सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि संपूर्ण व्यावसायिक समुदायाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मुंबईच्या विकास आराखड्याच्या निर्मितीच्या वेळी नरेडको, एमसीएचआय, क्रेडाईसह बांधकाम क्षेत्रातील विविध संस्थांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्यातून मुंबईसाठी प्रगतिशील विकास आराखडा तयार झाला.

Thursday, 3 September 2026

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदत व समन्वयासाठी नोडल अधिकारी

 पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदत व समन्वयासाठी नोडल अधिकारी

पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व संघटनांचे अभिनंदन केले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजारपणाच्या प्रसंगी आवश्यक ती मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय समन्वयासाठी मदत करणार आहे. हे आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने पत्रकारांना आरोग्यविषयक आवश्यक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने पत्रकारांना एकाच ठिकाणी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम पत्रकारांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्याची प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य

 सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर

मुंबई, दि. ३ : सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना अनियमित कामाच्या वेळांमुळे, तासनतास रस्त्यावर आणि घटनास्थळी राहून काम करावे लागल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध तपासणी आणि उपचार शिबीराला भेट देऊन पत्रकारांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार योगेश सागर, आमदार अभिमन्यू पवार,  आदींसह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांचे काम हे २४ तास सुरू असते. कामाचे निश्चित वेळापत्रक नसल्याने अनेकदा तासनतास रस्त्यावर, घटनास्थळी तसेच रात्री-अपरात्री काम करावे लागते. त्याचा साहजिकच आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा नियमित आरोग्य तपासण्या होत नसल्यामुळे एखादा आजार बळावल्यानंतर त्याचे निदान होते. त्याऐवजी अशा आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून प्राथमिक लक्षणे वेळीच ओळखून त्यावर तातडीने उपचार करता येतील. या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर, नामांकित संस्था आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पत्रकारांसोबतच तासनतास उभे राहून काम करणाऱ्या कॅमेरामनसाठीही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांसाठी स्टॉकिंगची व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणाऱ्या विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

 महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून

मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

 

मुंबई, दि. २ : विधानमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीने आज अभ्यास दौऱ्याअंतर्गत मुंबईतील विविध शासकीय व सामाजिक संस्थांना भेट दिली. यावेळी विद्यार्थिनी व बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निवास, आरोग्य, आहार, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या सुविधांचा समितीमार्फत प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.

समितीने वरळी येथील संत मीराबाई मुलींच्या शासकीय वसतिगृहास, मुंबई विद्यापीठातील महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहास तसेच अंधेरी येथील ए. डी. बावला अनाथालयास भेट दिली. यावेळी समितीच्या प्रमुख मोनिका राजळे, समितीच्या सदस्या सना मलिक, सीमा हिरे, मंजुळा गावित, स्नेहा दुबे आणि ज्योती गायकवाड तसेच सदस्य महेश सावंत, सुनील शिंदे आणि किरण सरनाईक उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास कोकण विभाग विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, मुंबई शहर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमा घाटगे, चिल्ड्रन्स एड सोसायटीचे मुख्य अधिकारी प्रवीण भावसार तसेच बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते.

नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन · नातेवाईकांना डीएनए नमुना प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी

मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन

·         नातेवाईकांना डीएनए नमुना प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. २: नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांच्या ओळख पटविण्याच्या प्रक्रियेसाठी डीएनए प्रोफायलिंग करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील संबंधित मृतांच्या नातेवाईकांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संबंधित न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (Forensic Science Laboratory) प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

डीएनए नमुना देण्यासाठी येताना नातेवाईकांनी ३ पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि आधारकार्ड किंवा पॅनकार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीच्या किमान दोन जवळच्या नातेवाईकांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. यामध्ये वडील, आई, मुलगा किंवा मुलगी यांचा समावेश आहे.

नातेवाईकांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिक येथे डीएनए नमुना संकलन व संबंधित प्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

मुंबईतील नागरिकांसाठी :

संचालनालय, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (Directorate of Forensic Science Laboratories) हंस भु्ग्रा मार्ग, कालिना, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-९८.

संपर्क : श्रीमती जे. एम. वाणी, सहाय्यक संचालक ८४८४९९२६८८

- एस. जी. पालस्कर ९५९४९६१९८३

- श्रीमती के. डी. महाजन ९५९४७४१६०५

  ई-मेल : dir.fsl@maharashtra.gov.in

  दूरध्वनी : ०२२-२६६७०७५५

 

पुण्यातील नागरिकांसाठी

प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (Regional Forensic Science Laboratory), पुणे

गणेशखिंड, चतुःशृंगी पोलीस ठाण्याशेजारी, पुणे.

संपर्क :  डी. सी. जोशी, उपसंचालक ९५०३०५९९५९

- सी. यू. चव्हाण, सहाय्यक संचालक ९७६७०२५०३१

  ई-मेल : dydir.rfslpune@maharashtra.gov.in

 

नाशिकमधील नागरिकांसाठी

प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (Regional Forensic Science Laboratory), नाशिक

विद्युतनगरसमोर, दिंडोरी रोड, लोक सहकारनगर, नाशिक.

संपर्क :- आर. आर. पवार, उपसंचालक ९४०५१८३२५३

- डॉ. आर. एम. पाटील, सहाय्यक संचालक ८२७५२५७३१७

  ई-मेल : dydir.rfslnashik@maharashtra.gov.in

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची ओळख पटविणे आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने डीएनए प्रोफायलिंग अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे संबंधित नातेवाईकांनी निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य संस्थांच्या गुणवत्तावाढीसाठी स्टार रेटिंग

 आरोग्य संस्थांच्या गुणवत्तावाढीसाठी स्टार रेटिंग

            राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्तावाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. विशेष सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, सुविधांची उपयुक्तता आणि रुग्णांचे अभिप्राय अशा विविध निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. शिवाय या व्यवस्थेत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीवर आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर तातडीने कार्यवाही करण्याची तसेच त्यानंतर नागरिकांशी संपर्क साधून सेवा मिळाल्याची खात्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सेवा दिली का यासोबतच सेवा मिळाली का यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

 

नागरिकांशी थेट संवादासाठी एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र

 नागरिकांशी थेट संवादासाठी एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र

            एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून १०४कॉल सेंटरचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या दूरध्वनींसह आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या संपर्क कॉल्सचेही नियोजन या केंद्रातून होणार आहे. अतिजोखमीच्या गर्भवती माता, प्रसूतीनंतरच्या माता, क्षयरुग्ण तसेच असंसर्गजन्य आजारांशी संबंधित नागरिकांचा पाठपुरावा करण्याबरोबरच रुग्णालयातील सेवांविषयी नागरिकांचे अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. या केंद्रात दैनंदिन सुमारे एक हजार कॉल्स हाताळण्याची व्यवस्था असून त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर्स कार्यरत राहणार आहेत. गंभीर अथवा तातडीच्या प्रकरणांची माहिती संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना तत्काळ कळविण्याची यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi