Sunday, 23 August 2026

आश्रमशाळा व निवासी संस्थांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी देखरेखीवर भर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून बालसुरक्षेचा आढावा

 आश्रमशाळा व निवासी संस्थांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी देखरेखीवर भर

  • राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून बालसुरक्षेचा आढावा

 

मुंबई, दि. २२ राज्यातील आश्रमशाळा, निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये बालकांना सुरक्षित, निरोगी व बालस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांचा आढावा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोगाच्या कार्यालयात नुकत्याच आयोजित बैठकीत घेण्यात आल. बालकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य, शिक्षण, निवास, स्वच्छता, अन्न-पाणी, बालहक्कांचे संरक्षण आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

या आढावा बैठकीस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक, सदस्य गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, संजय लाखेपाटील, अतुल देसाई, प्रविण भुजाडे, मिलन जंगम तसेच आयोगाच्या सचिव वंदना जैन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

 

निवासी संस्थांमध्ये बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकारी, अधीक्षक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी 24 तास संवेदनशील व जबाबदारीने कार्य करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. वरिष्ठ स्तरावरून देण्यात येणाऱ्या सूचनांची तळागाळातील यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याचे नियमित परीक्षण करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

 


Saturday, 22 August 2026

Tata STRIVE to boost skill development in Maharashtra

 Tata STRIVE to boost skill development in Maharashtra

– Chief Minister Devendra Fadnavis

 

Mumbai, August 22: Tata STRIVE, an initiative of the Tata Community Initiatives Trust, has undertaken several programmes to enhance the skills, employability, entrepreneurship and innovation capabilities of youth in Maharashtra. Tata STRIVE has been operating in the state since 2015, with major skill development centres functioning in Navi Mumbai, Pune, Nagpur and Nashik. These initiatives will provide further impetus to employment generation, said Chief Minister Devendra Fadnavis.

 

The Nagpur centre was inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis on July 26, 2026. More than 8,000 youth have so far received employment-oriented skill training through these major centres.

 

The initiative is being implemented under the leadership of Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation Mangal Prabhat Lodha. More than 6,000 trainees have also received employment-oriented skill training through Tata STRIVE’s expansion and partner centres. Specialised training facilities have been developed in Thane for the air-conditioning sector and in Pune and Bhilwadi in Sangli district for the automobile sector. Multi-skill training centres are also operational in Taloja and Nagpur.

 

‘Dual VET’ programme in ITIs

In partnership with Siemens, Tata STRIVE has implemented the Dual Vocational Education and Training (Dual VET) programme in 270 government Industrial Training Institutes (ITIs) across the state. More than 600 instructors have received training in pedagogical skills, while over 35,000 trainees have gained practical exposure to industries and projects. The programme provides ITI students with opportunities for on-the-job training during their first and second years.

 

In collaboration with Bajaj Auto Limited, a certificate course based on Total Productive Maintenance is being implemented in 18 ITIs—11 government and seven private—in Chhatrapati Sambhajinagar district. More than 3,500 trainees had enrolled in engineering courses through Bajaj Manufacturing’s ‘Bajaj Online Learning and Discovery’ learning management system. The initiative is now being implemented in more than 900 ITIs across Maharashtra, with over 80,000 trainees enrolled.

 

Focus on entrepreneurship and digital skills

Tata STRIVE has provided entrepreneurship training to more than 1,800 individuals in Maharashtra, along with financial and mentoring support to help them start businesses. Organisations including Sahyadri Farms, Tata Capital, Tata Communications, SIDBI, Original Composite Company and Maharashtra State Skill Development Society have supported these initiatives.

 

Through digital programmes implemented in partnership with Microsoft, Google and Amazon, more than 4,000 trainees in Maharashtra have received training in areas such as cybersecurity, IT systems, digital marketing, UX design and cloud computing.

 

Comprehensive MoU with Maharashtra Government

The Department of Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation of the Maharashtra Government and Tata Community Initiatives Trust signed a Memorandum of Understanding on July 15, 2022. The MoU covers employment-oriented skill training, entrepreneurship and innovation development, strengthening community-based enterprises, improving the employability of students in government ITIs, developing infrastructure for skill training, enhancing trainer capacity and expanding the Dual VET programme.

 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; देशभरातील 48 शिक्षकांची निवड महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; देशभरातील 48 शिक्षकांची निवड 

महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

 


नवी दिल्ली, दि. 22 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील चार मानकरी


डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड) :

केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. कविता गिट्टे यांनी दिव्यांग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसह वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती रोखण्यासाठीही प्रभावी प्रयत्न केले.

कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक) :

नाशिक महानगरपालिका शाळा क्र. 18चा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कुंदा बच्छाव यांनी विविध अभिनव उपक्रम राबविले. ‘मिशन मोबाईल-फ्री’ अंतर्गत ‘ज्ञानभिंती’, ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ आणि अमेरिकेतील शाळांशी ‘ई-ट्विनिंग’द्वारे संवाद अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना डिजिटल; तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अनुभव मिळवून दिला.

वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) :

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे कार्यरत असलेल्या वैभव कुलकर्णी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध शालेय व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) 

सैनिक स्कूल, सातारा येथे कार्यरत असलेल्या शिवप्रसाद टिंगरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविण्यासाठी विशेष योगदान दिले. एनडीए तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी लष्करी अधिकारी घडविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर 15 जून ते 20 जुलै 2026 या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नावीन्यपूर्ण अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य या निकषांवर मूल्यमापन करून अंतिम 48 शिक्षकांची निवड करण्यात आली.

विज्ञान भवनात राष्ट्रीय गौरव

शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती देणारे लघुपटही यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सोहळ्याचे दूरदर्शन, शिक्षण मंत्रालयाची ‘स्वयं प्रभा’वाहिनी तसेच अधिकृत वेबकास्ट आणि सोशल मीडिया माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.


0000

टाटा स्ट्राईव्ह'सोबतचे हे सहकार्य अधिक पुढे घेवून जाणार :

 टाटा स्ट्राईव्ह'सोबतचे हे सहकार्य अधिक पुढे घेवून जाणार : मनीषा वर्मा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की,"आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग आणि प्लेसमेंट वाढवण्यासाठी आम्ही 'टाटा स्ट्राईव्ह', सीमेन्स आणि बजाज यांच्या सहकार्याने ड्युअल व्होकेशनल एज्युकेशन सिस्टीम राबवत आहोत. यात 'टाटा स्ट्राईव्ह' हे आमचे प्रमुख पार्टनर आहेत. भविष्यात तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवत उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'टाटा स्ट्राईव्ह'सोबतचे हे सहकार्य अधिक पुढे घेवून जाणार आहोत."


पिंपरी-चिंचवडमधील ५ हजार बचतगटांना बळकटी टाटा स्ट्राइव्ह, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत

 पिंपरी-चिंचवडमधील ५ हजार बचतगटांना बळकटी

टाटा स्ट्राइव्ह, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत प्रोजेक्ट सक्षमाअंतर्गत तीन वर्षांत ५ हजार बचतगटांना बळकटी देण्यासाठी २०२३ पासून काम सुरु आहे. बचतगटांचे आधारभूत सर्वेक्षण, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन व प्रगतीचे निरीक्षण, प्रशिक्षण, उपजीविकेची मॉडेल्स विकसित करणे आणि बाजारपेठेशी जोडणी यावर या उपक्रमाचा भर आहे. यासाठी टाटा स्ट्राइव्हने पिंपरी-चिंचवड परिसरात तांत्रिक सहाय्य कक्ष स्थापन केला असून, डिसेंबर २०२३ पासून सुमारे १० हजार बचतगटांचे सहभागी पद्धतीने आधारभूत सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ५ हजार हून अधिक सक्रिय बचतगटांना विविध प्रशिक्षण आणि सहाय्याच्या माध्यमातून त्यांना अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे.

 

.

 

महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार

 महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २२ : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू असून, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे मोठी कौशल्य विकास केंद्रे कार्यरत आहेत. या उपक्रमातून रोजगार वाढीसाठी चालना मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

 

नागपूर केंद्राचे नुकतेच २६ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व मोठ्या केंद्रांमधून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टाटा स्ट्राइव्हच्या विविध विस्तार व भागीदार केंद्रांमधूनही ६ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे येथे वातानुकूलन क्षेत्रासाठी, तर पुणे आणि भिलवडी (सांगली) येथे ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी विशेष प्रशिक्षण सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय तळोजा आणि नागपूर येथे बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.

 

आयपीएसओडब्ल्यूए’च्या पाठबळामुळे महिला बचत गटांना बाजारपेठेची संधी

 आयपीएसओडब्ल्यूएच्या पाठबळामुळे महिला बचत गटांना बाजारपेठेची संधी

  • प्रदर्शन व विक्री उपक्रमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ

 

            मुंबई, दि. २१ : इंडियन पोलीस सर्व्हिस ऑफिसर्स वाइव्ज असोसिएशन आयपीएसओडब्ल्यूए यांच्या पुढाकाराने वरळी येथे आयोजित प्रदर्शन व विक्री उपक्रमामुळे विविध स्वयंसेवी संस्था, बचत गट आणि महिला उद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्यासह त्यांची विक्री करण्याची संधी मिळाली. या उपक्रमातून बचत गटाच्या  महिलांना उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे.

            प्रदर्शनात सहभागी महिला उद्योजकांनी एका दिवसात सुमारे २१ हजार रुपयांची उलाढाल केली. ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक उत्पन्नासोबतच आत्मविश्वास आणि व्यावसायिक अनुभव मिळण्यास मदत होत असल्याचे अनिर्वेदशक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक डॉ. आर. विमला (सेवानिवृत्त भा.प्र.से.) यांनी सांगितले. त्यांनी आयपीएसओडब्ल्यूएच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

            अनिर्वेदशक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध बचत गटांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने प्रदर्शनात मांडण्यात आली. यामध्ये ओमसाई बचत गटाचे कडधान्य, पंचशील पापड्या, सावित्रीबाई फुले उत्पादक गटाचे तूप व तांदूळ, बिरवाडकर टीचे विविध फ्लेवर्समधील चहा,


Featured post

Lakshvedhi