Tuesday, 11 August 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीबाबत काही महसूल मंडळांना तांत्रिक नोंदीअभावी लाभ न मिळाल्याच्या तक्रारींबाबतही

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीबाबत काही महसूल मंडळांना तांत्रिक नोंदीअभावी लाभ न मिळाल्याच्या तक्रारींबाबतही योग्य ती कार्यवाही प्राधान्याने करावी. तसेच आजगाव महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींमुळे अत्यल्प भरपाई मिळाल्याच्या प्रकरणाबाबतही उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

 

यावेळी मंत्री राणे म्हणाले, संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि अशा तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडला असून. अशा बिकट प्रसंगी शासन या शेतकऱ्यांना सर्वतोपारी मदत करण्यास बांधील आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा

 सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा

- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

·         तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. १० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितामध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व गतीने काम करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यंत्रणांना दिले.

 

मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, सीएससीचे व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

यावेळी मंत्री राणे म्हणाले, हवामानातील बदल व तापमानवाढीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक नोंदी व कागदपत्रांतील त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळू शकलेला नाही. या सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी. काही विमा प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे रद्द झाल्याचे निदर्शनास आले असून, त्या प्रकरणांची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करावे. हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांतील अडचणी सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीबाबत काही महसूल मंडळांना तांत्रिक नोंदीअभावी लाभ न मिळाल्याच्या तक्रारींबाबतही योग्य ती कार्यवाही प्राधान्याने करावी. तसेच आजगाव महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींमुळे अत्यल्प भरपाई मिळाल्याच्या प्रकरणाबाबतही उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

 

यावेळी मंत्री राणे म्हणाले, संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि अशा तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडला असून. अशा बिकट प्रसंगी शासन या शेतकऱ्यांना सर्वतोपारी मदत करण्यास बांधील आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

सरकार–उद्योग भागीदारीला चालना

 सरकारउद्योग भागीदारीला चालना

 

महाराष्ट्राच्या ईव्ही धोरणासोबतच केंद्र सरकारच्या पीएम-ई-ड्राइव्ह योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकार, वाहन उत्पादक आणि वाहतूकदार यांच्यातील प्रभावी भागीदारीमुळे देशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा वापर वेगाने वाढेल, असे त्यांनी सांगितले.

 

इलेक्ट्रिक मोबिलिटीमुळे केवळ वाहन उद्योगातच नव्हे, तर बॅटरी तंत्रज्ञान, संशोधन-विकास, उत्पादन, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि वाहन सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण होतील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

 

आज आपण केवळ इलेक्ट्रिक ट्रकचे लॉन्चिंग करत नाही, तर स्वच्छ, आत्मनिर्भर आणि शाश्वत भारताच्या भविष्याचा मार्ग खुला करत आहोत. महाराष्ट्र या परिवर्तनात केवळ सहभागी राहणार नाही, तर त्याचे नेतृत्व करेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

0000

३५० किमीपर्यंत रेंज; फास्ट चार्जिंगमुळे उत्पादकता वाढणार

 ३५० किमीपर्यंत रेंज; फास्ट चार्जिंगमुळे उत्पादकता वाढणार

 

या इलेक्ट्रिक ट्रकची एका चार्जमध्ये सुमारे ३५० किलोमीटरपर्यंतची रेंज, फास्ट चार्जिंगची सुविधा आणि कमी ऑपरेटिंग खर्च ही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. कमी वेळेत चार्जिंग पूर्ण झाल्याने ट्रक अधिक वेळ रस्त्यावर धावू शकतो आणि वाहतूकदारांची उत्पादकता वाढू शकते.

 

हा ट्रक केवळ पर्यावरणपूरक नाही, तर वाहतूकदार आणि चालकांसाठी अधिक फायदेशीर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे. भविष्यातील व्यावसायिक वाहतुकीची दिशा आता स्पष्ट झाली आहे, असे सरनाईक म्हणाले.

 


दिव्यांगांना रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध

 दिव्यांगांना रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे निःशुल्क वाटप

·         दिव्यांगांना स्वावलंबी होण्यास मदत होणार

·         भविष्यातही शिबिरांचे सातत्य राखण्याची ग्वाही

 

नागपूर, दि. 10 : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येत आहे. सहाय्यक साधने उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यातही अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर, जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग व कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींसाठी निःशुल्क जयपूर फूट साहित्य व सहाय्यक साधने मोजमाप व वाटप शिबिर  कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार संजय भेंडे, आ. राजीव पोतदार, आ. कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, आ. मोहन मते, मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, सहसचिव (मुख्यमंत्री कार्यालय) आशा पठाण आदी यावेळी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार जयपूर फूट साहित्य तसेच विविध सहाय्यभूत साधनांचे मोजमाप करून त्यांचे निःशुल्क वितरण करण्यात आले. आवश्यक साधने मिळाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन त्यांना अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले.

                                      

भारतामध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम विकसित होत असल्याचे सांगून

 भारतामध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम विकसित होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले., भारताकडे सर्वात मोठी युवा शक्ती आहे. तिरंगा हातात घेऊन बाहेर पडणाऱ्या या तरुणाईला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही. भारत एक मोठी महासत्ता म्हणून उदयास येत आहे.

भारताची प्रगती काही शक्तींना खटकत आहे. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारताचा विकासाचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नवभारताच्या संकल्पनेतून आगामी काळात भारत विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर अग्रस्थानी दिसेल,असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

या रॅलीसाठी वरळी सी फेस येथे हजारो मुंबईकर एकत्र आले होते. तिरंगा ध्वज हातात घेतलेले नागरिक, युवक, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. भारत माता की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘वंदे मातरम्अशा घोषणांसह देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेले.

भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

भारतामध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम विकसित होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले., भारताकडे सर्वात मोठी युवा शक्ती आहे. तिरंगा हातात घेऊन बाहेर पडणाऱ्या या तरुणाईला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही. भारत एक मोठी महासत्ता म्हणून उदयास येत आहे.

Featured post

Lakshvedhi