Tuesday, 11 August 2026

सरकार–उद्योग भागीदारीला चालना

 सरकारउद्योग भागीदारीला चालना

 

महाराष्ट्राच्या ईव्ही धोरणासोबतच केंद्र सरकारच्या पीएम-ई-ड्राइव्ह योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकार, वाहन उत्पादक आणि वाहतूकदार यांच्यातील प्रभावी भागीदारीमुळे देशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा वापर वेगाने वाढेल, असे त्यांनी सांगितले.

 

इलेक्ट्रिक मोबिलिटीमुळे केवळ वाहन उद्योगातच नव्हे, तर बॅटरी तंत्रज्ञान, संशोधन-विकास, उत्पादन, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि वाहन सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण होतील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

 

आज आपण केवळ इलेक्ट्रिक ट्रकचे लॉन्चिंग करत नाही, तर स्वच्छ, आत्मनिर्भर आणि शाश्वत भारताच्या भविष्याचा मार्ग खुला करत आहोत. महाराष्ट्र या परिवर्तनात केवळ सहभागी राहणार नाही, तर त्याचे नेतृत्व करेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi