Saturday, 30 May 2026

२५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’; लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवावा

 २५ जूनपासून नशामुक्त महाराष्ट्र अभियान’;

लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवावा

 – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

  • मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस 160 मान्यवराची ऑनलाईन उपस्थिती

मुंबई, दि. ३० : येत्या २५ जूनपासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त महाराष्ट्र अभियान मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुमारे 160 मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच बैठकीस महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच लोकप्रतिनिधी. पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीत लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरासंदर्भातील तक्रारी आणि सूचना मांडल्या. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले. नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासा

 अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत;

विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई, दि. ३० : राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवेश निश्चित करताना ही कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ.महेश पालकर यांनी याबाबत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना जारी केल्या आहेत. सन २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक १ सुरू असून २९ मे २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्यपणे सादर करण्याची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत, त्यांच्याकडून गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करण्यात येईल, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

            गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीत सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थी व पालकांना करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

            या निर्णयामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत वेळेत सहभागी होणे शक्य होणार असून प्रवेश प्रक्रियेला अधिक गती व सुलभता मिळेल, असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

तक्रार कशी कराल?

 तक्रार कशी कराल?

औषधांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास तात्काळ एफडीएकडे तक्रार करावी. तक्रारीमध्ये नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संबंधित औषध अथवा पदार्थाची माहिती नमूद करावी. नागरिकांच्या सर्व तक्रारींची गोपनीयतेने पडताळणी करून तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल.

नागरिकांना तक्रार नोंदविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असून, टोल-फ्री हेल्पलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती सहआयुक्त (औषधे) यांनी दिली.

0000

भिवंडीत 'मिथेनॉल'चा मोठा साठा जप्त

 भिवंडीत 'मिथेनॉल'चा मोठा साठा जप्त

  • आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

मुंबई, दि. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून मिथेनॉलचा भिवंडी येथे धाड टाकून ५,९२९ किलो साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात पुणे प्रकरणातील दारूमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरविण्यात आल्याचे समोर आले आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न व औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. अवघ्या ३० रुपयांत विकल्या जाणाऱ्या या दारूमध्ये 'मिथेनॉल' हे विषारी रसायन मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले.

२५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’; लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवावा

 २५ जूनपासून नशामुक्त महाराष्ट्र अभियान’;

लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवावा

 – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

  • मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस 160 मान्यवराची ऑनलाईन उपस्थिती

मुंबई, दि. ३० : येत्या २५ जूनपासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त महाराष्ट्र अभियान मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुमारे 160 मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच बैठकीस महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच लोकप्रतिनिधी. पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीत लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरासंदर्भातील तक्रारी आणि सूचना मांडल्या. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले. नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना साकार

  देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे

            कचरामुक्त शहराची संकल्पना साकार

                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         खागी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प

·         तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया ;28 टन गॅसची निर्मिती

नागपूर, दि. 30 : देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खागी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 भांडेवाडी परिसरात केवा सुस बडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहातर्फे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीना हातीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटकर, केवा सुसबडे या प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक रुंदा ठाकूर, फायनान्स डायरेक्टर विनोद तणदोन, उपाध्यक्ष विजय चिपळूणकर तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लि. चे उद्घाटन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लि. चे उद्घाटन

            नागपूर, दि. 30 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन झाले.

चिंचभवन येथील काचोरे पाटील नगरात या बँकेच्या 6व्या शाखेचे उद्घाटन झाले. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार संदीप जोशी, महापौर नीता ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, श्रीराम अर्बन को- ऑप. बँक लि.चे अध्यक्ष पराग सराफ, उपाध्यक्ष अजित गोकर्ण आदी यावेळी उपस्थित होते.

       यावेळी बँकेचे अध्यक्ष पराग सराफ यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना बँकेच्या प्रगती विषयी माहिती दिली तसेच संचालक मंडळाचा परिचय करून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या नवीन शाखेला आणि संपूर्ण संचालक मंडळ व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Featured post

Lakshvedhi