देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे
कचरामुक्त शहराची संकल्पना साकार
· खासगी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प
· तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया ;28 टन गॅसची निर्मिती
नागपूर, दि. 30 : देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भांडेवाडी परिसरात केवा सुस बडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहातर्फे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीना हातीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, केवा सुसबडे या प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक रुंदा ठाकूर, फायनान्स डायरेक्टर विनोद तणदोन, उपाध्यक्ष विजय चिपळूणकर तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment